कलाग्राम, उद्याने, विरंगुळा केंद्र, बालोद्यानही

उद्यानातील सोयीसुविधांकडे सोर्इस्करपणे डोळेझाक केली जात होती. पर्यटनाला चालना मिळेल यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. पाच वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे उद्याच्या दोन फेज पूर्ण करण्यात आल्या. तिसर्या टप्प्यात ‘कलाग्राम’ची निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय विविध उद्यानांमध्ये नाना-नानी पार्क, विरंगुळा केंद्र, बालक्रीडांगण, व्यायाम व योगाची सुविधा देण्यात आली आहे.

असा आहे प्रकल्प

  • पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ निसर्गरम्य वातावरणात कलाग्राम साकारणार
  • सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले रंगमंदिर
  • विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी
  • सिंहगड रस्त्यावरील तुकार्इनगर परिसरात साडेबारा एकर जागेत वैशिष्ट्यपूर्ण लिली उद्यान

फायदा काय

  • स्थानिक कलाकारांसोबत देश-विदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी आणि प्रदर्शन भरवण्यासाठी ‘दिल्ली हट’च्या धर्तीवर हक्काचे व्यासपीठ
  • उद्यानांचा बहुउद्देशीय उपयोग होणार
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बालक्रीडांगण, व्यायाम करणार्यांसाठी ध्यान केंद्र, योग केंद्र, ओपन जिम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
  • वैशिष्ट्यपूर्ण उद्यानांच्या निर्मितीमुळे पर्यटनाला चालना