कायदा आणि सुव्यवस्था

पुणे शहरातीली आणि पर्वती मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. वाढत्या नागरीकरणाबरोबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सिंहगड रस्ता परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस स्टेशनची गरज होती. त्यासाठी जागेचे संपादन करून भूमिपूजन करण्यात आले. बिबवेवाडीत नव्याने पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आले.

अशी केली कामे

  • भाड्याच्या जागेतील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनला हक्काची जागा मिळवून दिली
  • पाच वर्षे पाठपुरावा करून पोलीस स्टेशनचे काम सुरू केले
  • बिबवेवाडीत सुसज्ज पोलीस स्टेशनचे काम पूर्ण केले
  • मतदारसंघातील पोलीस स्टेशन आणि चौक्यांना संगणक उपलब्ध करून दिले

फायदा काय

  • सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल
  • सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येण्यास मदत होर्इल
  • बिबवेवाडी येथील स्वतंत्र पोलीस चौकीमुळे या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत झाली आहे
  • प्रशासनातील संगणकाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाजाला गती व पारदर्शकता वाढली आहे