क्रीडा

शहरातील क्रीडांगणाची दुरवस्था झाली होती. जी क्रीडांगणे किंवा क्रीडासंकुले विकसित करण्यात आली होती, त्यांची योग्यप्रकारे देखभाल-दुरुस्ती होत नव्हती. क्रीडांगणांचा विकास आणि सध्या असलेल्या क्रीडासंकुलांचा योग्य वापर करणे आवश्यक होते. त्यासाठी विविध देशी खेळांना प्रोत्साहन दिले. क्रीडांगणे विकसित करून प्रशिक्षणाची व्यवस्था केली.

अशी केली कामे…

  • शाळेतील क्रीडांगणे विकसित करणार आणि प्रशिक्षकांच्या नियुक्त्या
  • बिबवेवाडीतील जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉलची निर्मिती
  • आमार चषक आणि मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन
  • योगासनांचे महत्त्व लक्षात घेऊन शाळा, उद्यानांमध्ये योग केंद्रांची स्थापना

फायदा काय

  • विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होणार
  • क्रीडा संकुलातून होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळणार
  • स्पर्धात्मक वातावणामुळे खेळाडूंना गुणवत्ता आणि कौशल्य सिद्ध करण्याची संधी प्राप्त होणार
  • योग प्रशिक्षणामुळे शारीरिक व्यायाम, भावनात्मक समतोल आणि आध्यात्मिक प्रगती