घनकचरा व्यवस्थापन
समाविष्ट गावांसह पुणे शहरात दररोज सुमारे २१०० टन कचरा निर्माण होतो. कचरा संकलन, वर्गीकरण आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याबाबत प्रभावीपणे काम करण्याची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. ओला कचरा प्रक्रियेचे छोटे प्रकल्प, कचरा वाहतुकीसाठी गाड्या, स्वच्छता अभियान या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
असा आहे प्रकल्प
- कचर्यावर प्रक्रिया करणारे बायोगॅस सारखे स्थानिक पातळीवरील छोटे प्रकल्प सुरू
- पु. ल. देशपांडे उद्यानात कचर्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प
- ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती अभियान
- महापालिकेच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने साफसफार्इचे काम सुरू
फायदा काय….
- कचर्यावर प्रक्रिया करणारी मशिन उपलब्ध करून दिल्याने प्रायोगिक तत्वावर बारा सोसायट्यांमध्ये कचर्यावर प्रक्रिया सुरू
- कचरा उचलणार्या छोट्या गाड्या आणि ट्रक उपलब्ध करून दिल्याने कचरा संकलनाला गती
- यांत्रिकी पद्धतीने साफसफार्इमुळे प्रक्रिया वेगवान
- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती