पर्यावरण संवर्धन
‘हरित पुणे‘च्या घोषणा झाल्या. परंतु पुणे हरित करण्यात आणि वाढते प्रदूषण रोखण्यात अपयश आले होते. टेकड्यांवर अतिक्रमणे, वृक्षारोपण, वननिर्मिती, योजनांकडे दुर्लक्ष झाले होते. सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प बंद पडले. पर्जन्यजल संधारण योजनेची अंमलबजावणी झाली नाही. या उणिवा लक्षात घेऊन पर्वती वनक्षेत्रासाठी स्वतंत्र आराखडा, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा आदी उपाययोजना केल्या.
अशा आहेत योजना
- टेकड्या आणि मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करणार
- पर्यावरणाचे जतन करीत पाचगाव–पर्वती वनक्षेत्रासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार
- ७५० एकर वनक्षेत्र संरक्षित् व विकसित करण्यासाठी योजना
- विजेची वाढती मागणी आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून अपारंपरिक उर्जास्त्रोत वापराला प्रोत्साहन
फायदा काय….
- परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत घट होणार
- पाचगाव–पर्वती वनक्षेत्रात व्यायामप्रेमी, फिरायला येणारे नागरिक आणि पर्यटकांसाठी सुविधा मिळणार
- नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी निसर्ग परिचय केंद्रासारखे उपक्रम यशस्वी
- सौरउर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे विजेच्या मागणीत घट होणार आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार