पानशेत पूरग्रस्त

जमीन मालकी हक्काने मिळविण्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून लढा देणार्या पानशेत पूरग्रस्तांना सरकार दरबारी न्याय मिळत नव्हता. प्रशासन आणि मंत्री स्तरावर उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करीत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अशी केली कामे

  • पानशेत पूरग्रस्तांना भाडेपट्ट्याने जमिनी देण्यात आल्या होत्या.
  • तब्बल ५८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जमिनीचा मालकी हक्क देण्यात आला.
  • मालकी हक्कासाठी १९७६ च्या दराने शुल्क आकारले जाणार
  • याच धर्तीवर पानशेत पूरग्रस्त वसाहतीतील वाढीव बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे

फायदा काय….

  • सहकार नगर, पद्मावती भागातील गृहनिर्माण संस्थांना जमिनीच्या मालकी हक्कामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे
  • पानशेत पूरग्रस्तांना वारसा हक्क मिहणार असून बॅंकेचे कर्ज सहजपणे घेता येणार आहे
  • सरकारच्या परवानगीशिवाय मालमत्ता विकता येणार आहे
  • लक्ष्मीनगर, महर्षीनगर, दत्तवाडी, शिवदर्शन, दत्तवाडी परिसरातील पूरग्रस्त वसाहतीतील वाढीव बांधकामे नियमित होणार आहेत