पुणे मेट्रो

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सन २०१३ मध्ये मेट्रोचा पर्याय पुढे आला. पण आघाडी आणि यूपीएच्या श्रेयवादात मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळण्यात अपयश आले. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर केवळ तीन वर्षांत मेट्रोच्या तीन मार्गिका मंजूर होऊन काम सुरू झाले. मेट्रोचा कात्रजपर्यंत विस्तार करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहे. स्वारगेटकात्रज मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे.

असा आहे मेट्रो प्रकल्प

  • मेट्रो मार्ग स्वारगेटनिगडी १६.७ कि. मी. एकूण स्टेशन १४
  • स्वारगेटकात्रज मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात
  • शिवसृष्टी ते रामवाडी १४.६५ कि. मी. चा मार्ग एकूण स्टेशन १६
  • शिवाजीनगरहिंजवडी २३.३३ कि. मी. चा मार्ग एकूण स्टेशन २३

प्रकल्पाचा फायदा काय

  • सुरक्षित, जलद, विश्वसनीय, किफायतशीर, पर्यावरण संवर्धन करणारी वाहतूक व्यवस्था
  • सार्वजनिक वाहतुकीचा कणा, आरामदायी प्रवास, वेळेची ५० टक्के बचत
  • एका वेळी हजार प्रवासी क्षमता, वाहतुकीची कोंडी कमी होणार
  • पर्यावरणपूरक, हवेची गुणवत्ता सुधारणार, रस्ते वाहतुकीच्या तुलनेत २० टक्क्यांनी उर्जेचा वापर कमी