सुरळीत विद्युत पुरवठा
सततचे भारनियमन, अनियमित वीजपुरवठा, विजेचा लपंडाव यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. घरगुती ग्राहकांबरोबर व्यावसायिक आणि उद्योजकही मेटाकुटीला आले होते. पर्वती परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणच्या इन्फ्रा दोन योजनेअंतर्गत विविध विकासकामे केली. वीजवाहक तारा भूमिगत करण्यासाठी आमदारनिधी उपलब्ध करून दिला.
असा आहे प्रकल्प
- महावितरणच्या इन्फ्रा दोन योजनेअंतर्गत २८ कोटी रुपयांची विकासकामे केली
- पद्मावतीत नवीन सबस्टेशन आणि स्वीचिंग उपकेंद्र, स्वारगेटला सबस्टेशन आणि मार्केडयार्डला स्वीचिंग उपकेंद्र
- तीन उपविभागांमध्ये ४७ आणि पर्वती विभागात ६ रोहित्रांचे नियोजन
- वीजवाहन तारा भूमिगत करणे, रस्त्याला अडथळा ठरणारे खांब हलविणे, जुने डीपी, ट्रान्सफार्मर बदलणे अशी विकासकामे केली
फायदा काय….
- भारनियमन बंद झाले
- उद्योग, व्यवसायांना पुरेसा आणि नियमित पुरवठा मिळाल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
- पर्वती भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला
- वीजवाहक तारा भूमिगत केल्याने इमारतींना येणारा अडथळा बंद झाला आहे