आपत्ती व्यवस्थापन

गेल्या काही वर्षांत कालवा फुटी, आकस्मिक पूर अशा आपत्तींना आणि आगी लागण्यासारख्या घटनांचा सामना करावा लागला. प्रशासन, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे या संकटातून मार्ग काढला. आपत्कालिन व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रभावी वापर, अग्निशमन केंद्रांची निर्मिती आदी उपाययोजना केल्या.

असा आहे प्रकल्प

  • आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात येत आहे
  • सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटी केंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन पूरक तंत्रज्ञानाचा वापर
  • नदीलगतच्या भागांमध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून उपाययोजना
  • गंगाधाम येथे अग्निशमन केंद्र आणि कर्मचार्यांना निवासासह सोयी उपलब्ध करून दिल्या.

फायदा काय….

  • आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामुळे संकटकाळात उपाययोजना सुलभ होणार आहेत
  • स्मार्ट सिटी केंद्रामुळे आपत्तीची माहिती आणि आवश्यक मदतकार्याला गती प्राप्त होणार आहे
  • पूरस्थितीचे योग्य पद्धतीने नियोजन करणे शक्य
  • मार्केटयार्ड परिसरासाठी अग्निशमन केंद्राचा आधार होईल