जल शुद्धीकरण आणि नदी काठ सुधारणा

दूषित आणि रसायनयुक्त पाणी मिसळल्याने नद्या अस्वच्छ आणि प्रदूषित झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यासाठी आणि राडारोडा टाकण्यासाठी नदीपात्राचा वापर होत होता. नदी स्वच्छ आणि सुंदर करण्याची गरज लक्षात घेऊन मुळा-मुठा शुद्धीकरण योजनेसाठी ९९० कोटी रुपयांचे केंद्र सरकारचे अनुदान मिळाले आहे. नदी काठ सुशोभीकरण प्रकल्प शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

असा आहे प्रकल्प

  • राष्ट्रीय नदी सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत मुळा-मुठा सुधारणा प्रकल्प राबविण्यास प्रारंभ
  • या योजनेनुसार ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, ११३.६० किलोमीटरच्या मलवाहिन्या, २४ शौचालये उभारण्यात येत आहेत
  • अस्तित्वाव असलेल्या सांडपाणी-मैलापाणी प्रक्रिया केंद्रांचे नूतनीकरण
  • मुळा-मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी नदीकाठ सुशोभिकरण विकास प्रकल्प मंजुरीसाठी राज्य शासनाकडे

फायदा काय

  • शेतीसाठी प्रतिदिन ५१५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार
  • मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी होऊन जलपरिसंस्थेच्या संवर्धनासाठी लाभ
  • प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता प्रतिदिन ३९६ दशलक्ष लिटरने वाढणार
  • नदीकाछाचे सुशोभिकर, वॉकिंग ट्रॅ, छोट्या बागा, सायकल मार्ग, बोटिंगची सुविधा