चोवीस तास समान पाणीपुरवठा

राजकीय इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणातील पाण्याची गळती आणि वाटपातील असमानता यामुळे ही समस्या गंभीर झाली होती. हे चित्र बदलण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना, पर्वती येथे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

  • समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १०२ पैकी ८२ साठवण टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात
  • सतराशे किलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिन्या आणि प्रत्येक मिळकतीला पाणी ममीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
  • पर्वती येथील २५० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले
  • खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि पुढे लष्कर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले

फायदा काय….

  • समान पाणीपुरवठा योजनेमुळे २४ तास, स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल
  • पाण्याची गळती ४० टक्क्यांनी कमी होऊ शकेल
  • पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामुळे पर्वती, दांडेकर पूल, दत्तवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे
  • बंद जलवाहिनीमुळे पाण्याची गळती कमी होण्यास मदत होणार