दर्जेदार रस्ते
उत्कृष्ट आणि टिकाऊ दर्जाच्या रस्ते बांधणीकडे कॉंग्रेस आघाडी सरकारने कायमच दुर्लक्ष केले. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणार्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली नाही. हा प्रश्न लक्षात घेऊन पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली नाही. हा प्रश्न लक्षात घेऊन गेल्या पाच वर्षांत रस्ते निर्मितीचे गुणव्तापूरक काम, सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाची निर्मिती, स्मार्ट सिटीअंतर्गत बिबवेवाडी रस्ता ही विकासकामे पूर्ण केली.
अशी केली कामे
- सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्त्याची कामे अंतिम टप्प्यात
- स्मार्ट सिटीच्या धर्तीवर बिबवेवाडी मुख्य रस्त्याचा विकास
- पु. ल. देशपांडे उद्यान ते नवशा मारुती पादचारी मार्गाची निर्मिती
- मतदारसंघातील अंतर्गत रस्ते आणि सोसायट्यांमधील रस्त्यांची कामे पूर्ण
फायदा काय झाला
- सिंहगड रस्ता आणि परिसरात वाढलेला वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार
- सनसिटी, धनलक्ष्मी, महालक्ष्मी सोसायटी, विठ्ठलनगर, सिंहगड रस्ता परिसरात वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध
- बिबवेवाडी रस्त्याच्या सुशोभीकरणामुळे एक वेगळा आयाम निर्माण झाला, रस्त्याच्या सौंदर्यात भर
- सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक होण्यास मदत झाली