वाहतूक कोंडीवर उपाय : उड्डाणपूल

पर्वती मतदारसंघातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्त्यांबरोबरच उड्डाणपूल निर्मितीच आवश्यकता होती. त्यानुसार स्वारगेट उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रेड सेपरेटर तयार करण्यात आले आहेत. मार्केड यार्ड चौकातील उड्डाणपुलाचे काम ही पूर्ण झाले आहे. सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

असे उभारले उड्डाणपूल

  • स्वारगेट चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले
  • या ठिकाणी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले
  • मार्केट यार्ड ते सेव्हन लव्हज चौकात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले
  • सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले

फायदा काय झाला

  • स्वारगेट उड्डाणपुलामुळे चौकातील वाहतूक कोंडी कमी झाली
  • बाजीराव रस्ता, सारसबाग, सोलापूर रस्ता, टिळक रस्ता या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली
  • मार्केड यार्ड परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली
  • सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे विश्रांतीनगर, हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग या भागातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे