बिबवेवाडीत ५०० खाटांचे रुग्णालय

ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू, अशी घोषणा गेली पन्नास वर्षे कॉंग्रेसकडून केली जात होती. परंतु ती प्रत्यक्षात कधीच आली नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर उपचारांसाठीची योजनाही अपयशी ठरली होती. बिबवेवाडीत ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. तसेच गरीब रुग्णांसाठीची योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

असा आहे प्रकल्प

  • दक्षिण पुण्यात ससूनच्या धर्तीवर साडेसोळा एकर जागवेर रुग्णालयाची उभारणी
  • र्इएसआयसीच्या जागेवर पाचशे खाटांचे रुग्णालय, कामगारांसाठी १०० राखीव खाटा
  • पहिल्या टप्प्यात २०० खाटांचे काम पूर्णत्वास दुसर्या टप्प्यात आणखी ३०० खाटांचे नियोजन
  • आरोग्य योजनांच्या सुसूत्रीकरणासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणार

फायदा काय

  • दक्षिण पुण्यातील नागरिकांना अतिशय कमी किमतीत उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत
  • अत्याधुनिक आरोग्य सुविधा, यंत्रणा उपलब्ध होणार
  • कॅन्सर, किडनी, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग आदी विविध प्रकारचे स्वतंत्र विभाग राहणार आहेत.
  • गोरगरीब रुग्णांना विविध आरोग्य योजनांचा सहजपणे लाभ मिळणार आहे