माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी
पुण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग विशेषत: स्टार्टअपला आवश्यक असणार्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज होती. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणारे धोरण आखण्यात आले. उद्योगवाढीसाठी ऑप्टिकल फायबर, सर्वसामान्य नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता केंद्र, वाय-फाय अशा सुविधा देण्यात आल्या.
अशी कामे केली
- आयटी क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी सवलती
- या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान धोरण
- एंटरप्राइज जीआयएस, ई-लर्निंग, सीटी डिजिटल स्टॅटेजी, पीएमसी केअर २.० अशा योजना
- वाय-फाय आणि ऑप्टिकल फायबर धोरण
फायदा काय
- आयटी क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे
- आयटी धोरणामुळे या क्षेत्रातील उद्योजकांचे शहरातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढणार आहे
- मिळकतकर, जन्म-मृत्यू दाखले, डीबीटी, ई-लर्निंग आदी सुविधा ऑनलाइन
- रस्ते दुरुस्ती, नळ जोडणी, सेवावाहिन्या, पीएमपीएमएल सेवा या बाबत वेळेत माहिती मिळणार