स्वारगेटचे बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमॉडेल हब)

वाहतुकीची सर्वाधिक वर्दळ, एसटी आणि पीएमपी स्थानके यामुळे स्वारगेट चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. हा प्रश्न लक्षात घेऊन प्रवाशांना वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मल्टिमॉडेल हब उभारण्याची मागणी केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून, त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

असा आहे प्रकल्प

  • देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरणार्या एक हजार ६०० कोटी रुपयांच्या मल्टिमोडेल ट्रान्सपोर्ट हबला मान्यता
  • मेट्रोचे भुयारी स्टेशन होणार
  • या स्टेशनमध्ये शॉपिंग मॉल, मनोरंजनाच्या सुविधा मिळणार
  • एसटी स्थानक, पीएमपी स्थानक आणि गणेश कला क्रीडा मंचला जोडणारे स्वतंत्र मार्ग

फायदा काय होणार

  • स्वारगेटच्या केशवराज जेधे चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होणार
  • स्वारगेट परिसराचा चेहरामोहरा बदलणार आणि प्रवासीकेंद्रित वाहतूक सुविधा निर्माण होणार
  • प्रवाशांसाठी एसटी-पीएमपी, मेट्रो आणि रिक्षाची एकाच ठिकाणी सुविधा मिळणार
  • एसटी, पीएमपी, चारचाकी, रिक्षा, दुचाकींच्या स्वतंत्र पार्किंगमुळे कोंडी कमी होणार