पर्वती होणार स्मार्ट मतदारसंघ
ज्या वेगाने पुणे शहराची वाढ झाली, त्या प्रमाणात सोयीसुविधा तसेच अत्याधुनिक यंत्रणाचा वापर झाला नाही. त्यामुळे शहराला बकालपणा आला. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. या योजनेत पुणे शहराची पहिल्याच यादीत निवड झाली.
प्रकल्प असा आहे
- शहरात पायाभूत सुविधा सुधारून त्यांना आधुनिकतेची जोड देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे
- त्यानुसार प्रशस्त रस्ते, पदपथ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत र्इ-बस, कचरा गाड्यांवरील जीपीएस यंत्रणा, पब्लिक शेअरिंग यांचा वापर
- स्मार्ट सिटी योजनेचा नियंत्रण कक्ष सिंहगड रस्त्यावर सुरू
- शहरात ठिकठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा देण्यात आली
फायदा काय झाला
- स्मार्ट सिटीमुळे सर्वच पायाभूत विकासकामांमध्ये गुणवत्ता, गतिमानता आली
- सुशोभित रस्ते, बस वाहतुकीची कार्यक्षमता, र्इ-बस आदींमुळे वाहतुकीचे सक्षमीकरण
- र्इ-कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, सौरउर्जा यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात गतिमानता
- पीएमसी केअर, स्काडा, स्मार्ट हेल्थ, सीसीटीव्ही यंत्रणा योजनांचा नागरिकांना फायदा